सारं काही हरवुन बसले...
सारं काही हरवुन बसले...
सारं काही हरवुन बसले ,
तु गेलास सोडून मला,
मी स्वतःला विसरून बसले ...
अंत ना या दुःखाचा प्रिया,
काळ गेला जाळून मला,
तुझ्या घावांचा हा कल्लोळ,
जाळुन खाक करतील मला...
सांज थांबत नाही उंबऱ्यावर,
चंद्रही काळवंडला इथे,
कवडसा येऊ पाहते चोरून,
बंद मनाच्या खिडक्या ,
धाडती परतवुन ...
सारं काही हरवुन बसले ,
तु गेलास सोडून मला,
मी स्वतःला विसरून बसले ...
डोळ्यांत आसवांचा दुष्काळ,
भेगाळली मनाची जमीन,
तु वार केला अलवार ,
हे भयानक रहस्य ना उलगडले ,
कळले जेव्हा फसले ,
हृदयातुन स्पंदने हरवले ,
स्वप्नांचे धागे उसवले ,
ना कळले कधी हे घडले,
सारं काही हरवुन बसले ,
तु गेलास सोडून मला,
मी स्वतःला विसरून बसले ...
