बालपण
बालपण
बालपणी धावलो आम्ही
गाई, म्हशी अन बकऱ्या मागोनी,
पाय दुखू लागताच
बसूनी राहिलो रस्त्या मधूनी
आधी प्राधान्य द्यावे लागले घरकामाला,
त्याकरिता बुट्टीही मारावी लागली शाळेला
शाळेत जाताना डब्याचा तर पत्ताच नव्हता,
चटणी भाकरीच्या जोडीला फक्त कांदाच होता
गौरी गणपती अन दिवाळीच्या सणाला
वर्षातून दोनदाच मिळायचे गोडधोड खायाला,
नाही मिळाली वही अन पेन लिखाणाला,
नेहमीच पाटी पेन्सिल होती अभ्यासाला
गुरुजींनी दिलेला गृहपाठ नाही जमला करायला,
तर निमंत्रण जायचं थेट आई किंवा बापाला
लहानपणी धाक असायचा थोरा मोठ्यांचा,
म्हणूनच प्रश्न उद्भवत नव्हता वाकडं पाऊल पडण्याचा
गुमान शिकलो ठेवून जाण त्या परिस्थितीची,
म्हणूनच तर आम्ही शिखरे गाठू शकलो यशाची
