लोकशाही
लोकशाही
आली कधीच नाही तांड्यात लोकशाही
आई मला कळेना वर्गात लोकशाही
नाही मुळीच किंमत राजा तुझ्या मताला
झाला लिलाव विकली पैशात लोकशाही
ना रोजगार धंदा जगणे महाग झाले
कष्टास भाव नाही कर्जात लोकशाही
अन्याय होत आहे बोलू नकोस काही
डोळे मिटून आहे मौनात लोकशाही
कंत्राट पास झाले व्यापार शिक्षणाचा
श्रीमंत माणसांच्या नोटात लोकशाही
