अजूनही तुझी वाट पाहतेय...
अजूनही तुझी वाट पाहतेय...
अजुनही मी वाट पाहतेय तुझी ,
हो तुझी ...
तोडून बंधने मनाला मोकळे करूनी गेला,
कसा करू हा श्वास मोकळा ,
जो श्वास तुझ्यामुळेच स्पंदनास आला,
जगण्याला अर्थ येता ,
प्रेमाला ही रंग चढला ,
मेंदीच्या रंगात रंगुनी ,
तुजसाठी हा जीव , वेडावला ...
त्याच वळण रस्त्यावर जीथे ,
तु मला सोडून गेला ...
अजुनही मी वाट पाहतेय तुझी ,
हो तुझी मी वाट पाहतेय ...
बट रेशमी मागे सारत ,
प्रेमाने कानात बोलला ,
ऐकुन त
े बोल प्रेमाचे ,
लाजून भिंतीवरचा आरसा गेला,
चंद्र चांदण्या ओंजळीत तुझ्या,
अशा तु मजवर उधळल्या ,
कळले ना मला जाशील सोडून,
देहातुन प्राण ओढूनी नेला,
उरले फक्त शब्द घायाळ हे ,
गुंफिता त्यास डोळ्यांतून गळला,
नको नकोसा क्षण घायाळी ,
परत एकदा आठवुनी गेला ,
तुजसाठी हा जीव , वेडावला ...
त्याच वळण रस्त्यावर जीथे ,
तु मला सोडून गेला ...
अजुनही मी वाट पाहतेय तुझी ,
हो तुझी मी वाट पाहतेय ...