सस्पेन्स
सस्पेन्स
कोणतीही असली जरी स्पर्धा
निकालाची सर्वांनाच उत्कंठा
प्रत्येक जण काम करतो जीव ओतून
तरी थोडे डावे उजवे जाते होऊन
कुणी विसरतो शब्द
कुणी विसरतो ताल
अचूक संवादाची फेक जिथे
निकालावर जास्त नजर तिथे
राजकारण असो वा समाजकारण
निकाल पाहण्याची उत्कंठा कायम
पेपर संपले ची खुशी साजरी करती पार्टीने
निकालाची तारीख जवळ येतात
तोंड सोडून बस्ती मुकाट्याने
आई-बाबांना निकाल दाखवताना
सस्पेन्स तयार होतो घरात
पहिला नंबर पाहताच
नाचू लागतात आनंदात
