कडू घोट
कडू घोट
परिस्थिती कधी कधी अशी
अपयशाचा कडू घोट पाजते
जगण किती खडतर आहे
हे पावलो- पावली दाखवते
लढण्यास सज्ज रहा
ती क्षणोक्षणी आपणास सांगते
मिळेल पुन्हा यश तुम्हाला
ही आशा मनात रुजवते
क्षणिक सुखाची छाया देऊन
अनंत दुखाला समोर भेटवते
कोण कशी त्यावर मात करतो
यावर आपले भाग्य उजळवते
जीवनात येणाऱ्या प्रसंगाशी
नेहमी संघर्ष करत राहा
नशिबाचा कडू घोट घेऊन
आयुष्याचा फुलोरा फुलवत रहा
भूत भविष्याचे नको ते विचार
आनंदाचे सार वास्तवात
स्वच्छंदी जगण्यास आपल्याला
सांगते..
