STORYMIRROR

Narendra Patil

Others

3  

Narendra Patil

Others

भस्म

भस्म

1 min
213

काहीतरी चाललंय आत, 

महाभयंकर, प्रलयंकारी!..... 


मी ध्यानस्थ, मौन राहून

पाहतोय तटस्थपणे, 

मनाचा उद्वेग !..... 


अंगभर पसरलेलं निळं जहर, 

विचारांना आलेली तांडवाची लहर


पंचेंद्रियांच्या बंधनातून

सुटण्या उफाळलेले गदर

अक्राळविक्राळ जटा आपटत

मनाने केलेला सर्वोच्च कहर..... 


मनाच्या अशा रौद्रावस्थेला

सरस्वतीचं वरदान लाभावं

अन् शब्दब्रह्माचं नादब्रह्माशी

पवित्र मिलन व्हावं!..... 


त्या मिलनातून जन्माव्यात, 

कवितेच्या दिव्य ओळी

लावण्या शब्दचंदन भस्म, 

बिथरलेल्या मनाच्या भाळी


मग निवळावी परिस्थिती, 

पसरावी नीरव स्मशानशांतता.... 

विरक्तीच्या गर्भात, 

मनाच्या पुनश्च स्थापनेसाठी !.....


Rate this content
Log in