परिमळ
परिमळ
मातीचा मिसळून कणकण
अवघ्या पृथ्वीची वीट बनवून
तिवर उभा रहा तू विठ्ठला
इथल्या सर्व पुंडलिकांसाठी
प्राणीमात्रांचे 'स्व' परिवलन
सवे तुझ्याच भोवती परिभ्रमण
चाललेय पहा तू विठ्ठला
तुझ्यात विलीन होण्यासाठी
करता मात्र नामाचे स्मरण
येते शहारून हे तन-मन
नसा-नसांत वहा तू विठ्ठला
तुझाच संग लाभण्यासाठी
कर आभाळाइतकी ओंजळ
उधळ मुक्त कृपेचा परिमळ
धरेवर रुप महा तू विठ्ठला
घे अणू-रेणू व्यापण्यासाठी
जन्म-मृत्यूचा चुकवून फेरा
आपला भेद मिटवण्यासाठी