नॉस्टॅल्जिया
नॉस्टॅल्जिया
आज तो पुन्हा दिसला
शांत झालेल्या मनात जणू आठवणींचा तुफान आला
चेहरा ही विसरत होते त्याचा, पण आज पुन्हा जीव त्याच्यासाठी झुरला
विचार हि नको होता त्याचा पण आज पुन्हा त्या स्वप्नांचा पाऊस पडला
डोळ्यात लपलेल्या पाण्याला रस्ता ही मोकळा झाला
आज तो पुन्हा दिसला ....
नजरेने पाहण्यास नकार दिला
पण हृदयाचा मात्र ठोकाच चुकला
आवाज ऐकण्यास कानांचा नकार होता
पण ओडता कानी अंगावर शहारा होता
आज तो पुन्हा का दिसला
