ये ना लवकर
ये ना लवकर
दिवस रात्र तुझ्या आठवणीने मन ही व्याकूळ होते
वाटेकडे तुझ्या डोळे माझे, रोज तुझीच मी वाट पाहते
सकाळच्या प्रहरा पासून ते रात्रीच्या चांदण्या पर्यंत
नजर तुझाच चेहरा शोधत असते
उठल्यापासून अगदी झोपे पर्यंत
ओठी नाव ही तुझेच राहते
रोज समजूत काढते मी माझ्याच मनाची
आज नाही पण उद्या येशील तू ,याची आतुरताच वेगळी
आजू बाजू सारच कस परक वाटत
तुझ्याविना खरच आता खूप एकट वाटत
बस झालं ना आता ये ना लवकर निघून
डोळे ही पाणावले आता तुझी वाट पाहून

