पुस्तकांच्या विश्वात
पुस्तकांच्या विश्वात
तुझ्या विश्वात रमण आता रोजच झालं
प्रत्येक पात्र मला रोज नव्याने भेटतं
कधी फिरते मी जादूच्या दुनियेत
कधी पाहून थक्क होते विज्ञानाचे चमत्कार
तुझ्याच विश्वात भेटतो मला तज्ञांचा सल्ला
तुझ्याच पानात सापडतो मला संतांचा धडा
त्याच पानात असतात इतिहासाच्या गाथा
स्वातंत्र्यवीरांची विरगाथा ही शहारे आणते
त्याचं वीर मरण आज ची डोळ्यात पाणी आणते
सार कस फक्त तुझ्याच मुळे जिवंत राहत
भूत वर्तमान भविष्य तुझ्यातच सापडत
पुस्तकांच्या त्या पानात आठवणी ही बऱ्याच असतात
त्याने दिलेल पहिलं फूल
त्याच्या आठवणीत लिहिलेलं पाहिलं पत्र
पुस्तक परतीच्या बहाणे सुरू झालेला संवाद
आज हरवून जातोय रे प्रेमाचा हा प्रवास
मोबाईल च्या दुनियेत भावना पानावर कमी आल्या
इ _बुक वाचता वाचता पलटणाऱ्या पानाचा आवाज कमी झाला
बुकमार्क म्हणून दुमडलेले ते पानं हरवून गेल
गोष्टीचा पुस्तकातलं वाघ ही आता यू _ट्यूब वर डरकाळी फोडू लागला
