ये ना आता भेटायला
ये ना आता भेटायला
ये ना सख्या मिटवायला ही तळमळ
भेट ना सख्या घट्ट द्यायला आलिंगन
संपव ना रे हा दुरावा आता
मन साद घाली तुला , ये ना आता भेटायला
नजर थकली रे आता तुझी वाट पाहून
आटल रे पाणी डोळ्यातले सतत वाहून
अजून किती दिवस एकटीने प्रवास करू
हातात हात घेऊनी तुझा सख्या कधी मी बागडू
संपव ना रे हा दुरावा आता
मन साद घाली तुला , ये ना आता भेटायला
पायातले पैंजण ही आता आवाज करत नाही
कारण माझ्या येण्याची वाट कोणी पाहत नाही
बांगड्यांची किणकिण ही आजकाल मुकी असते
कारण त्याचा ओढीने आता इथे कोणी जागत नाहीे
संपव ना रे हा दुरावा आता
मन साद घाली तुला , ये ना आता भेटायला
Anisha Sudhir Deshmukh

