मतदानाचा व्यापार
मतदानाचा व्यापार
सुरू होईल आता , मतदानाचा व्यापार
500 ..1000 च्या नोटा चोरतील आपला , मूलभूत अधिकार
कर्तव्य आणि भूक यात ,पुन्हा सामान्यांनी भुकेला निवडल
5 वर्षांचं आपलं भविष्य , चुकीच्या हातात सहज दिलं
जाणीव होता स्वतःला, तो मनाला समजावेल
अरे कोणी ही आलं तरी , भाजी भाकरी माझीच हरवेल
सगळा भ्रष्टाचार पाहून लाखो मन , अधिकारी होण्याची स्वप्न पाहतील
उखडून टाकू हा भ्रष्टाराचा कारभार, म्हणून रात्र दिवस एक करतील
पण बनता स्वतः अधिकारी , या साऱ्याला ते ही बळी असतील
कधी स्वतःच्या जीवासाठी , कधी नोकरीच्या बचावासाठी,ते ही भ्रष्टाचारी बनतील
कोणी एखादा असेल ही प्रामाणिक , पण करेल सलाम तो ही याच विकृतीला
कारण गुंड असला तरी नेता आहे, त्याच संरक्षण, ही च नोकरी येईल त्याच्या वाटेला
सत्ता आणि पैशाच्या भुकेपोटी, अजून किती अन्याय करणार
एका विजयासाठी किती जणांचा बळी असणार
हा बळी नुसता व्यक्ती नसून,
जनतेच्या हक्काचा असणार
संविधानात मांडलेल्या कित्येक नियमांचा असणार
देशाच्या यशाचा असणार
आपल्या स्वप्नाचा असणार
पण हा मतदानाचा व्यापार असाच सुरू राहणार
