हे ही वर्ष सरले
हे ही वर्ष सरले
बघता बघता हे ही वर्ष निघून गेलं
नाही म्हणंल तरी खूप काही बदलून गेलं
कधी हसवलं , कधी रडवल
पण प्रत्येकवेळी काही तरी नवीन शिकवलं
प्रयत्न केला तर त्याच फळ मिळत जाणून होतो आधी
पण या वर्षी त्याची ही प्रचिती आली
म्हणतात लोक लागतात गोष्टी नशिबात मिळण्यासाठी
याची हि झलक आताच घडली
भर उन्हात पडणारा पाऊस ,
दारा तोंडाशी आलेला घास नेणारा दुष्काळ
तर पीक चांगल येऊन दर न मिळाल्याने
पुन्हा तीच दुःखाची माळ
प्रयत्नांती परमेश्वर म्हणत जिंकलेले सलग सामने
पण नशिबा समोर हारलेले विश्वचषक
पण तरी ही स्वतःचीच स्पर्धा करून मोडलेले काही जुने विक्रम
आपण ही कुठे कमी नाही हे मात्र
दाखवून दिलं अथलेटिक्स च्या सामन्यानी
राजकारण आणि लोकशाही याचा मेळ
अजून हि जमलाच नाही
नवीन नवीन तंत्रज्ञान शोधले प्रगतीसाठी
पण AI चा दुरुपयोग ही दिसला याच साली
शिकवले सारे मंत्र जगण्याचे
दिला एक सुंदर धडा
जाणवलं आता मला
कधी तिखट _कधी तुरट
जगणं कधी आंबट तर कधी गोड
