तू असताना
तू असताना
सारच किती सोपं वाटतं तू असताना ..
रडणं असो व मनमुराद हसणं
एका क्षणी भरभरून बोलण
तर कधी नजर झुकवून लाजणं
जगासमोर जितकं शहाणं
तुझ्यासमोर तितकंच वेड बनून राहण
किती बदलत गेल्या यार गोष्टी नकळत
मित्र ... मित्र म्हणता तू झाला आयुष्यभरचा सोबती
बघता बघता माझ विश्व ही वासल तूझ्याच अवती भोवती
माझी निराशा अन् भीती प्रीती मध्ये बदलली ...
काटेरी वाटेवर जणू कुंदकळी खुलली
प्रत्येक अडचणी वेळी तुझी साथ लाभली
जणू अमावस्येला ही सोबती चंद्राची सावली
आकाशी असलेली चांदण्याची चादर जशी सागराला सुंदर बनवते...
तसच तुझ्या प्रेमात मी रोज नव्याने बहरते

