STORYMIRROR

Anisha Sudhir Deshmukh

Others

3  

Anisha Sudhir Deshmukh

Others

काही गोष्टी त्या विधात्या सोबत

काही गोष्टी त्या विधात्या सोबत

1 min
161

अजून किती परीक्षा देवा तू रोज घेणार आहेस,

चांगला कलाकार म्हणून कठीण प्रसंग देतो आहेस

की नकळत साऱ्या गोंधळात मला च विसरून गेला आहेस //


तुझ तर असत ना रे लक्ष तूझ्या साऱ्याच भक्तांवर 

मग या भक्ताची हाक नाही का रे येत तूझ्या कानावर//


काय चुकत माझं ,मला ते तरी सांग 

जाणते मी माझ्यावरी आहे ,तूझी कृपादृष्टी अथांग //


देतोस ही साथ मला माझ्या प्रत्येक अडचणीत तू

जमते का रे देवा मला भूमिका, जशी मनात तुझ्या तशी हुबहु//


रोज करते जाप तूझ्या नावाचा , द्यास ही मनी तूझ्या मुखाचा

चुकतो हा भाबडा भक्त कधी ,मांडताना यातना दुःखाच्या //


आभार ही तुझेच मानते आणि दोष ही तुलाच देते 

कारण तुझ्याच समोर हे मन ही मोकळे होते//


सारी दुनिया करेल रे माझ्या वागण्याच परीक्षण

पण तूच आहेस फक्तं जो करेल माझ्या दुःखाचं तारण//


Rate this content
Log in