तुझ पाहता सख्या ❤️
तुझ पाहता सख्या ❤️
तुझ पाहता सख्या मनी चा, ठाव का रे सुटावा
तुझ्याच अवतीभोवती, गाव माझा का रे वसावा
जुळता नजर कधी, मंद गाली लाज का यावी
पुन्हा पुन्हा तुझ्यात का, भान ही हरपून जायी
होता आड नजरेच्या तू, जीव कासावीस का होई
तूच का वसतो सख्या, माझ्या ठाई ठाई
स्वप्नात ही रोज रात्री तुझेच मी गीत गाते
तुझ सागर मानून, तुझ्यातच मी सामावून जाते
अवखळ रात जेव्हा ,चंद्राच्या सोबतीत खुलते
तुझ पाहून सख्या गाली, तशीच खळी पडते

