खरी शिवजयंती
खरी शिवजयंती
सोळाव्या वर्षी स्वराज्याची शप्पथ घेऊन स्वराज्य स्थापले राजानी
जाती भेद मोडून जनतेला एकत्र आणलं महाराजांनी
आणि आज त्यांच्याच नावावर जातीभेद करून मोठी झाली राजकारणी
रूप घेतलं मावळ्याच घालून कानात बाली अन् लावून कपाळी चंद्रकोर
पण रस्त्याने सुरक्षित नाही आमच्याच घरची पोर
ज्या किल्ल्यावर मावळे आपल्या अस्तित्वासाठी लढले
ते दुर्ग आम्ही प्लास्टिक आणि कचऱ्यानी भरवले
दुष्मनाला लढा देत तटस्थ उभ्या या दुर्गाच्या भिंती
ज्यावर कोरून येतो आपण आपली नाव ओळख अन् प्रेमकहाणी
महाराजांचा नवा पुतळा उभा करा अशा मागण्या अवश्य करा
पण ज्या आहेत त्यांना आधी जपा
Dj च्या अश्लील गाण्यांवर थिरकून साजरी नको तर
महाराजांच्या विचारांनी समृद्ध बनून मनवू शिवजयंती
