कस चाललय तुझ
कस चाललय तुझ
कोणी विचारला प्रश्न,कस चाललय तुझ?
तर सगळ कस मस्त असत
पण रोज नवीन समस्येने
मन मात्र त्रस्त असत //१//ओठ बनतात पडदा खोट्या आशेचा
पण डोळे देतात पुरावा खऱ्या स्थितीचा //२//
लाख प्रश्न मनात काहूर माजवतात
किती खोटं अजून जगायचं रोज मला विचारतात //३//
कुठून देऊ उत्तर मलाच काही ठाऊक नाही
किती केल प्रयत्न तरी मन ही भाऊक राही//४//
मग बुद्धी देते उत्तर तिच्या परीने
पण आयुष्य नाही ना ओ चालत फक्तं व्यवहाराने//५//
देवाणघेवाण असली भावनांची तरी त्यात हिशोब राहत नाही
आणि माझ माझ म्हणता काहीच हाती उरत नाही //६//
मग पुन्हा रात्री जेव्हा डोकं टेकवते
शांत झोपेसाठी मग तग मग करते //७//
समाधान शोध .अस कुठे तरी वाचलं होत
जीवन जगण्याच हेच एक तंत्र हे कळून चुकल होत //८//
रोज गर्दीत सुख शोधत होते
पण समाधान जवळच होत हे मात्र जरा उशिराच कळलं होत //९//
मग काय , साराच कस सोन्याहून पिवळ होत
आणि मस्त चाललय आमचं हे ही तितकंच खर होत //१०//
