नारी
नारी
काळोख्याला भेदुन उगवला स्वातंत्र्याचा सूर्य,
पदोपदी क्षणोक्षणी उजवीला स्त्री स्वातंत्र्याचा पर्व.
भारतमाताचा सन्मान करून घेतला गर्व,
मणिपूरच्या घटनेने घेतले लुटून माझे सर्वस्व .
आजही स्त्रीला निर्वस्त्र करून फिरवितात,
धृतराष्ट्र सारखे राजा भीष्मासारखे मान खाली घालतात.
द्रौपदीच्या साह्याला तर आले होते द्वारकाधीश केशव,
भारत भूमीच्या भूतलावर आज एकही नाही का केशव?
आज भारत माताच्या डोळ्यातून पडतात अश्रू थेंब,
सोश्यलल मीडियावर ओरडण्यासाठी व्हिडियो करतात सेव.
लक्ष्मी, सरस्वती,दुर्गा म्हणून पूजिले सर्वत्र स्त्रीला,
एकटी पाहून भरबाजारी नीलाम केले तिच्या आबरूला.
बेटी बचाव बेटी पढावचा सर्वानी अपनविला मंत्र,
नारीसुरक्षेसाठी न जागला समाज की कायदाकीय तंत्र.
अबला बनुन नको डोळ्यातून गाळत बसू अश्रू थेंब ,
तुझ्या बचाव करण्यासाठी कळयुगात येणार नाही देव.
आज मंजुला आपल्या लेखणीतून करते शब्दरुपी प्रहार,
स्वरक्षणासाठी हदयात हिंमत आणि हाती धर तलवार.
