मायबोली
मायबोली
1 min
180
आईच्या गर्भात शिकली मी मायबोली,
मातृतुल्य वाटे मला माझी मायबोली.
अमृताचा साठा आहे माझी मायबोली
तुकोबाचे अभंग आणि ज्ञानेश्वराची ओवी.
आई जिजाऊची शिकवण आहे माझी मायबोली,
शिवबाच्या शौर्याने सुसज्ज आहे माझी मायबोली.
संतांची पार्श्वभूमी आहे माझी मायबोली,
अमृताहुनी गोड आहे माझी मराठी मायबोली.
कुसुमाग्रजांची शब्द चमत्कृती आहे माझी मायबोली,
बालकवींच्या कल्पनाने रंगली आहे माझी मायबोली.
माझ्या मायबोलीने मला शिकवले शब्द व अर्थ,
त्यांच्या शब्दांनी मी झाली खरोखर समृद्ध.
माझ्या शब्दांनी मी गुंफते कवितारुपी माळ,
मातृभाषेच्या चरणी राहील माझी कविता सर्वकाळ.
