आईची शिकवण
आईची शिकवण
1 min
2
सौभाग्याचं लेणं हिरवा चुडा आणि लाल कुंकू,
सप्तपदीच्या वचनाने बांधली गेली मी सखू.
आई-वडिलांनी केले कन्यादान लेक चालली सासरला,
जिथे खेळली जिथे नांदली ते घर झाले आज माहेरघर.
सुटले माझे जन्मदाते,आई बाबा सुटले भाऊ बहीण,
आई बाबाची ममता सुटली सुटल्या सई बहीण.
आईची शिकवण बाबाचे संस्कार आणि डोळ्यात आहे अश्रू,
डोळ्यात लपवून अश्रू कशी मी सासरी जाऊन हसू.
सासरच्या वाटेत होते प्रेम आणि आनंदाच्या फुलांचे सडे,
माहेर माझे मागे सुटले असे मला नाही कधी कळले.
रायांच्या प्रेमात रंगून सजविले संसाराचे मधुर स्वप्न,
सासू सासऱ्याच्या रूपात मिळवले प्रेमळ आप्तजन.
दोन कुळाच्या सन्मानाचा दोर आहे माझ्या जवळ,
सोडून मायेचे माहेरघर प्रेमाच्या सासरला केले जवळ.
