कृष्ण कान्हा
कृष्ण कान्हा
1 min
3
कंसाच्या कारावासात जन्मला कृष्ण कान्हा,
देवकीच्या बाळा तु नंद यशोदेचा तान्हा.
,हाथी घोडा पालखीचा होऊ लागला गजर.
गोकुळाष्टमीला गोकुळात उजवीला उत्सव.
देवकी वसुदेवाला झाला पुत्र कृष्णाचा वियोग,
नंद यशोदेला घडला मातृ पितृ चा संयोग.
कालिया नागाचे कृष्णा ने केलं मर्दन,
गोवर्धन पर्वताचे कृष्णाने करविले पुजन अर्चन.
दही दूध आणि लोण्याची केली चोरी,
रास रचविला गोपी आणि सोबत राधा गोरी.
कंस सारख्या दृष्टाचा केला कृष्णाने संहार,
कुबजासारख्या भक्ताचा केला कृष्णाने उद्धार .
अस्वस्थ अर्जुनाला सांगितला गीतेचा सार,
कृष्णा तुझ्या महिमेचा या जगात नाही पार
