मोबाईलच्या दुनियेत...
मोबाईलच्या दुनियेत...
पंख असताना
घरट्यात अशी बसू लागली पाखरं,
मोबाईलच्या दुनियेत
हरवली कशी ही सारी लेकरं.
विसरले हे सारेच
खेळ अन विसरले गाणं,
विसरले असे देहभान
अन विसरून गेले खानपान.
डोक्यात यांच्या
भिनू लागले वेगळेच वारे,
कसे बिघडून गेले
यांचे आचरण सारे.
अरे देवा तूच सांग ना
यावर जालीम उपाय,
तूच बदलू शकतोस
यांची ही सवय.
या लेकरांच्या पुढे
टेकले गुडघे आम्ही,
बदल करण्या यांच्यात
करा काहीतरी तुम्ही.
