काळजी
काळजी
जन्म दिलेल्या बाळाचे संगोपन करण्यासाठी लागणा-या वस्तू देता येईल का ? म्हणून काळजी वाटते
कलेकलेने मोठा होऊ लागला की उत्तम शिक्षण देता येईल का ? म्हणून काळजी वाटते
शिक्षणाचे न परवडणारे ओझे कुठपर्यंत झेलता येईल ? म्हणून काळजी वाटते
शिक्षण संपले की स्वःताच्या पायावर सुरक्षितरित्या उभा राहिल का ? म्हणून काळजी वाटते
कमाई करायला लागला की पैशाची किंमत व साठवणूक करेल का? म्हणून काळजी वाटते
लग्न झाल्यावर पहिलेसारखी परिस्थिती आता घरात नांदेल का? म्हणून काळजी वाटते
उतारवयात आपल्याला दुर्लक्षित केले जाईल का? म्हणून काळजी वाटते
असे काळजीचे ओझे घेऊन आपले जीवन ढकलणे चालूच असते
विनाकारण जीवाला घोर लावून काळजीची सवय लावून घेते
अशी संपुर्ण आयुष्यभर काळजी आपल्या पाठीशी असतेसंपून जाते आयुष्य पण काळजी मात्र संपत नसते
