तुझ्यावर प्रेम करताना
तुझ्यावर प्रेम करताना


उषेची सांज झालो मी तुझ्या विश्वात रमताना
नभाचा चंद्र झालो मी तुझ्या कक्षेत फिरताना
सुखाची सावली राहो तुझ्यामाथी सदा राणी
वडाचे झाड झालो मी उन्हाचा जाळ सहताना
किती लिहिल्यात गझला मी तुझ्या प्रेमात असताना
सुगंधी बाग झालो मी तुझ्यावर काव्य लिहताना
रिते केले किती प्याले तुझ्या विरहात मी साकी
सुरेचा दास झालो मी तुझा आधार नसताना
दिले सारे तुला माझे अता उरलो न माझा मी
जगाच्या पार झालो मी तुझ्यावर प्रेम करताना