सखे माझी तुला साथ आहे
सखे माझी तुला साथ आहे
त्याने फास घेताच सखे
तुझ्या डोळ्यात अश्रूंचा पुर आला..
तुझ्या कपाळीचा चंद्र पुसला गेला
माझ्या काळजात चर्रर झालं...
या दु:खाशी भांडायलाही तुला सवड मिळाली नाही
पदर खोचून चिमण्या
बाळाची पोटाच्या खळग्याची आग..
विझवण्याची तुझी चिंता...
तुझ्या वेदना ह्रूदयातच मुरल्या जिरल्या....
सखे दु:ख दाखवू नकोस कुणास..
इथे पावलो पावली गिधाडं बसली आहेत..
चिधंड्या करुन टाकतील
तुझ्या भावनांच्या..आणि
बाजारही भरवण्यास मागे पुढे पाहणार नाही
दु:ख गीळ,गळ्यातला आवंढा गळ्यातच ठेव..
अश्रू झरू देउ नकोस
उगाच हसरा चेहरा ठेव..
स्वतःचा दिपस्तंभ स्वतःच हो
कारण इथे प्रत्येक वेदनेचा सौदा होतो..
प्रेमाचा आव आणणारे गल्लोगल्ली आहेत..
पण !जेव्हा तुला खरच गरज भासेल तेव्हा पळ काढतील ..
भीउ नकोस मी आहेच तुला सोबतीला...
जग तस तर फार सुंदर आहे...
म्हणून तुझ्याही पेक्षा जे दु :खी
आहेत त्यांच्यासाठी मी सावली होईन
तू विसावा घे...
आणि चल वंचिताला न्याय देण्यास
झगडण्यासाठीमाझी तुला साथ आहे
माझी तुला साथ आहे !!
