STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy

3  

Prashant Shinde

Fantasy

शुक्रवार सायंकाळ...!

शुक्रवार सायंकाळ...!

1 min
8.4K


कॉम्बो पॅकची मजा

मुलं आपापल्या पद्धतीने घेत होती

ते पाहताना मला

मजा वाटत होती


शहरी भागाची ही

भेळपुरी पाणीपुरी वाटली

सारी मौजच क्षणात

आठवणीने आटली


कोठे तो लपंडाव

कोठे तो सूर पारंब्या

कोठे ती सूर काठी आणि

कोठे तो भेंडा गोंडा


कोठे तो भोवरा

कोठे ती लंगडी

कोठे त्या काचा कवड्या आणि

कोठे ते येकट्ट दुकट्ट


कोठे ती सायकल रेस

कोठे तो खोखो

कोठे ती कब्बडी आणि

कोठे ती पळण्याची शर्यत


कोठे ते पतंग उडवण

कोठे ते पोहायला जाण

कोठे ते झाडावर कैऱ्या खाण आणि

कोठे ते पेरू चोरण


कोठे बम्पर शाळेत आणण

साखर खिशातून न्हेण

सर्वांनी मिळून झाकून खाण आणि

कोठे ती छडी खाण


कोठे ती गाडीच्या

जू वरची धडाम धुडकी

कोठे ती चक्रा वरची

दोरीच्या झोळीची गिरकी


आज हे सार कॉम्बो

पॅक मुळे आठवलं

आणि भर भर

नजरे समोरून सरकल


सायंकाळ माझी आज

आठवणींनी सजली

तो मात्र हसला बारा मजली

म्हणे ही रे तुझी हौस कसली...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy