।। श्री स्वामी कृपा ।।
।। श्री स्वामी कृपा ।।
स्वामी माझी आई,
स्वामी माझे बाबा,
स्वामी हृदय तुझे रे,
जणू नारळाचा गाभा.
स्वामी माझी ताई,
स्वामी माझा दादा,
स्वामी सखा तूची माझा,
जणू कृष्ण तू मी राधा.
स्वामी माझा गुरु,
स्वामी कल्पतरु,
स्वामी कृपा तुझी होता,
जणू लागे दैन्य हारू.
स्वामी कृपा सिंधू,
स्वामी दैवी दाता,
स्वामी देई न मागता,
जणू कामधेनू माता.