श्रद्धा
श्रद्धा
(सहाक्षरी)
अत्त दीप भव
मार्गक्रम करा
यशाचे शिखर
सदा तुम्ही चढा...१
भीती मनातील
तीच अंधश्रद्धा
संशयात बुडे
संसार सुखाचा....२
धागेदोरे गंडे
बांधे भोंदू बाबा
घर नारी पैसे
साऱ्यावर डोळा...३
संत शिकवण
अंगी ती रुजवा
महापुरूषच
डोक्यात बसवा....४
भूतदया करणे
सत्कर्म हे जाणा
आई बाप सेवा
हीच खरी श्रद्धा....५
