शरदाचे चांदणे
शरदाचे चांदणे
सये बघ आकाशात
रम्य सुंदर शर्वरी
शारदीय चांदण्यात
तेज झळके अंबरी
नभी चंद्रमा झोकात
सोन पीतवर्ण खुले
भेटण्यास सल्लजशी
शुक्राची चांदणी झुले!!
नभी निरभ्र नीलिमा
झिरपते तेजोप्रभा
मंद शीतल गारवा
सोनसळी दिसे आभा
मेघ चांदणबनात
वृष्टी चांदणपुष्पांची
शोभा तारा तारकांची
सये मन्मन तृप्तची
