श्रावणी ओढ
श्रावणी ओढ


ओघळ थेंबाचा सुगंध विसावला
श्रावणात अल्लड सरी बेभान आवेगता..१..
हरित आभुषणांनी निसर्गही नटला
श्रावणी पावसाची ओढ ती लागता..२..
झरे अंकुरीत गारवा मोहरला
श्रावणी नभ स्वच्छंद वारा आलापता..३..
टपोरे मोतिया थेंब कल्पवृक्ष बहरला
श्रावण ओढीने आसंमत हुंकारता..४..
मळभ दूर मनात उत्साह झंकारला
लागे तुझी ओढ श्रावणसरीत ओथंबता
लागे तुझी ओढ श्रावणसरीत ओथंबता..५..