STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

शोध मनाचा

शोध मनाचा

1 min
135

शांत धरित्री शांत सरोवर

हळवे मन्मन उसळे आतून

हाका त्याच्या आर्त ऐकून

बसले काठी एकांत साधून


विश्वाच्या दिव्य पसा-यातून 

काय हरवले काय गवसले

शोध कशाकशाचा घेतला

हाती माझ्या काय लागले 


नको गणती नश्वर संपत्तीची

स्थावर जंगम मालकी हक्काची

नको गणतीत दागदागिने

मनात येई आगळी आसक्ती


सुख वाटले हरिप्रार्थनेमधी

अनाथ दुबळ्या नजरेमधी

दुःखितांना मनी जाणता

मोद विलसे तया मुखावरी


स्वार्थाची वसने गळून पडली

परदुःखाची आस लागली 

शांततेने मनी जादू जाहली

आगळीच दृष्टी मला लाभली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract