STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

3  

Shila Ambhure

Inspirational

शंख शिंपले

शंख शिंपले

1 min
664



(हायकू)


शंख शिंपले

किती ते अनमोल

तळाशी खोल


सहज कधी

कोणा ना सापडले

जळी दडले


रत्नाकर तो

अथांग निळाशार

वारसदार


शंख शिंपले

आकार विविधांगी

वेगळ्या रंगी


साज तयांचा

लेतो जलधि निळा

लावितो लळा


शंख शिंपले

करिता परिधान

वाढतो मान


कलाकुसर

सागरी संपत्तीची

ती आवडीची

~~~~~~~~~~~~~~~


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational