STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Inspirational

3.0  

शिल्पा म. वाघमारे

Inspirational

सहल

सहल

1 min
18.6K


सहल एक निमित्त आहे

धकाधकीतून निघण्यासाठी

त्याच चार भिंतीशिवाय

वेगळे काही पाहण्यासाठी

सहल म्हणजे विरंगुळा

व्यापात गुंतलेल्यांसाठी

ऊठ.. पळ.. चल.. आवर

यातून सुटका करण्यासाठी

सहल म्हणजे अनोखे विश्व

मोकळ्या हवेत जगण्यासाठी

कोंडलेल्या श्वासाला

नवसंजीवन देण्यासाठी

सहल असते एक भरारी

नवकल्पनांच्या पंखांसाठी

कुठेतरी गुदमरलेल्या

अफाट आत्मविश्वासासाठी

सहल असते एक कविता

तुझ्यातल्या सुप्त कवीसाठी

भरकटलेल्या मनाला

योग्य दिशा देण्यासाठी

सहल आहे

एक दिव्य शाळा

मुक्त शिक्षण घेण्यासाठी

तेच पाटी-पुस्तक सोडून

भन्नाट काही शिकण्यासाठी

सहल म्हणजे लपलेला आनंद

पुन्हा खेळण्या-बागडण्यासाठी

हरवत चाललेलं बालपण

पुन्हा मिळवून देण्यासाठी

सहल म्हणजे खरा जिव्हाळा

निसर्ग मातेच्या कुशीसाठी

तिच्यासोबत राहून

तिच्यासारखं होण्यासाठी

सहल म्हणजे सखोल ज्ञान

आदर्श जीवन जगण्यासाठी

माणूस आहोत तरीही

*माणुसकी* शिकण्यासाठी

सहल असतो फेरफटका

अन् एक आठवण ठेवण्यासाठी

की पुन्हा परतून जायचं आहे

घरी आई-बाबांसाठी....


Rate this content
Log in