STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Drama Inspirational

3  

शुभांगी कोतवाल

Drama Inspirational

सहल

सहल

2 mins
135

कॉलेज चे काही मित्र व मैत्रिणी , 

कट्ट्या वर बसून चहा पिताना ,

विषय काढतात उन्हाळ्याच्या सुट्टीचा, 

आणि म्हणतात कुठे बरं जावे सहलीला??


कुणी म्हणे लोणावळा , तर कुणी माथेरान , 

कुणी शिर्डी तर कुणी म्हणे कोल्हापूर , 

एकमत काही होईना , निर्णय पक्का होईना ,

कमी खर्चात नवीन ठिकाणी जाऊया , 

आणि उद्या भेटून काय तो निर्णय घेऊया , 


शेवटी ठरतं करूया एखादा साहसी प्रवास ,

आपापले सामान, खायचे जिन्नस, भांडी 

तंबू साठी लागणारे सामान , टॉर्च , 

सर्व घेवून त्यांनी केली प्रवासाला सुरुवात , 


घरच्यांनी कशीबशी दिली होती परवानगी , 

निघाले कुठेतरी जंगल , पहाड , डोंगर , नदी 

सुंदर निसर्गाच्या संनिध्यात , शांत ठिकाणी ,

बराचसा प्रवास होता सुरू पायी - पायी ,


सायंकाळी सुरक्षित ठिकाणी ठोकून तंबू ,

अन्न शिजवून , जेवून , घेतली विश्रांती , 

पहाटे झोप उडाली पक्ष्यांच्या किलबिलाटाने 

सुंदर असा तो परिसर आणि सूर्योदय, 

काही वाटसरू , गुरे ढोरे , बैलगाड्या ,


सगळंच कसं अपरिचित , शहरी जीवनात नसलेलं,

शुद्ध हवा व नदीचं खलखळणारं थंडगार पाणी ,

आंघोळ, न्याहारी आटोपून , निघाले पुढच्या प्रवासी ,

काही पक्ष्यांचे - प्राण्यांचे विचित्र आवाज , 

वर तळपणारा सूर्य व लागणारे ऊन, 


सर्वाला सामोरे जाऊन , निर्णयापासून न डगमगता 

ते पुढे चालत राहिले , कधी एखाद्या घनदाट वृक्षाच्या,

सावलीत बसून थोडी विश्रांती घेत होते , 

उंच डोंगर चढून वर रात्री विश्रांती घेवूया, 

म्हणून डोंगर चढायला सुरुवात केली ,

काही अडचणींवर मात करत पोहोचले शिखरावरती , 


रात्रीचा काळोख व सर्वदूर पसरलेली शांतता ,

त्यात फक्त चंद्र प्रकाश व टीमटीमनारे तारे , 

थंडगार वारा , आणि मनातला आत्मविश्वास , 

पोटपूजा करूंन, आपापले अंथरूण टाकून ,

गाण्यांच्या भेंड्या खेळता- खेळता निद्रस्त झाले ,


सकाळच्या सूर्यकिरणांनी उडाली सगळ्यांची झोप ,

सुरू झाला डोंगरावरून परतीचा प्रवास , 

खूप आल्हाददायी, आनंददायी होती सहल ,

ना मोबाईल , ना टेलिव्हिजन , नाही घर ,

सर्वांपासून दूर , फक्त निसर्गाचीच सोबत ,


खूप अविस्मरणीय , साहसी अशी ती सहल , 

शिकवून गेली बरच काही त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ,

मॅनेजमेंट , को - ऑपरेशन, आहे त्यात ,

आणि कमी खर्चात भागवून दाखवणं, 


पुस्तकी ज्ञानाचा व्यवहारात केलेला वापर 

सर्व काही आपोआप उलगडलं, समजलं, 

आई वडील , भाऊ - बहीण , देवाचं महत्व

सगळं काही शिकवून गेली ती सहल ! 

बदलून गेली जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन !!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama