STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Others Children

3  

Priti Dabade

Inspirational Others Children

सहल

सहल

1 min
286

धकाधकीच्या जीवनातून काढून वेळ

सहलीसाठी घालावा लागतो मेळ


कधी वाटे विरंगुळा

हा आहे नादच खुळा


मनमुरादपणे प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायचा

कधी अथांग सागर डोळ्यांत सामावायचा


कधी प्राचीन शिल्पकला बघायच्या

तर कधी संग्रहालयाला भेटी द्यायच्या


निसर्गाच्या कुशीत होऊन एकरूप

नवचैतन्याचे बघायला मिळते स्वरूप


वाटे खूप ताजेतवाने

साद घालत गुणगुणत गाणे


फुलझाडांशी गप्पा मारायच्या

प्राण्यांच्या डरकाळ्या ऐकायच्या


कधी किल्ले तर कधी कड्याकपाऱ्या

तर कधी सर कराव्या लागतात पायऱ्या


होते फिरताना थोडी दमछाक

तरीही फिरते दोन पायाचे चाक


सहल असते ज्ञानाचा खजिना

वेळ कसा जाई तेच कळेना


मोकळा श्वास घेत भटकंती करायची

आठवणींची शिदोरी येताना बांधून आणायची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational