शिवरायांचा आब!
शिवरायांचा आब!
आब राजांचा इतका महान
भागवी स्वातंत्र्याची तहान
असलो जरी आम्ही सान
विश्वात मिळतो मोठा मान
सर्व काही मुबलक आहे
कश्याची नाही इथे वाण
भारतभूमी सुजलाम सुफलाम
इथे प्रत्येक गोष्टीची आहे खाण
सत्याधारीत जीवन आपले
पाहतो आम्ही दुखले खुपले
धीर धरी रे धिरापपोटी
हेच तत्व खरे रे इथले
महाराजांची शिकवण आम्हा
त्याचा वाहतो सार्थ अभिमान
म्हणूनच बारापगड जाती
अन अनेक धर्मात नांदते इथे समाधान
सौख्य समाधान शांतीचे इथल्या
साऱ्या विश्वास दर्शन घडे
अश्वासही महाराजांच्या
महानतेचे सुख स्वप्न नित्य पडे
नतमस्तक होण्यासाठी
सदैव मान खाली विनम्रतेने झुके
शिवरायांच्या सम दुजा नाही
कोणी या जगती आमच्या मते
जय जय शिवराय मनोहर
उठतो अंतरातून जयजयकार
आहेत आम्हावर महाराजांचे
अनंत कोटी कोटी उपकार.....!!!
