STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

शिवभक्त..

शिवभक्त..

1 min
242

शिवराय तुम्ही शूरपती 

नरसिंह अन भूपती ..

जनकल्याणासाठी कार्य केले 

तुम्हीच आमचे छत्रपती ...


कार्य तुमचे सागरासम

 विस्तीर्ण वर्णू किती थोरवी ..

आमच्या मनमंदिरी सर्वोच्च

 तुमचे- मावळ्यांचे स्थान ...


पुण्यप्रतापी, न्यायी राजे 

विश्वी प्रिय शिवराय माझे ..

रोवुनी शिवध्वज किर्तीवंत 

शिवघोष ढोल ताशांसह वाजे...

 

खाचखळगे काटेरी वाट जरी 

वारसा चालवू तुमच्यात तरीही ..

शिवभक्त आम्ही तुमचे 

मुजरा करतात विश्वजनही ...


राजे तुमचा रुबाब आगळा 

तुम्ही स्वराज्य स्थापिले ..

"रयतेचा राजा" म्हणोनी

 साऱ्या विश्वाने वंदिले...


समता- एकतेचा आग्रह धरून

 शिवशाहीचा निग्रह धरू ..

न्याय- स्वातंत्र्याची बीजे रोवून

 अन्याय -अत्याचार दूर करू ..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational