शिलेदार
शिलेदार
आम्ही शिलेदार असू भूमीचे
भूमिका जरी असती वेगळया
सावरून घेवू या परिस्थितीला
तोंड देेेवू संकटाला आगळ्या
पाळत रहा नियम सारे
नका करु टाळाटाळ
घरातच रहा जपून सारे
निर्वाणीचा आलाय काळ
आम्ही असू सोबतीस तुुुमच्या
तुुुम्ही घ्या काळजी घरच्यांची
भिती नका बाळगू अनाहूत
कास धरा सकारात्मक विचारांची
