शिकवण तुझी...
शिकवण तुझी...
पहिल्याच श्वासासवे
कूस तुझी ऊबदार
जपताना मला स्पर्श
व्हायचा तो हळूवार
नको वाटायचं कधी
पडायचा जेव्हा मार
पाहताना जगाकडे
उमजलं त्याचं सार
येवो संकटे कितीही
मानायची नाही हार
भिडायचं बिनधास्त
हेच आहेत संस्कार
असो प्रसंग कसाही
कितीक होतात वार
शिकवण तुझी अशी
न भिता होते मी पार