STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Inspirational

4  

.प्रमोद घाटोळ

Inspirational

शेतकरी सर्जा

शेतकरी सर्जा

1 min
613



. शेतकरी सर्जा...


( वऱ्हाडी गेय रचना )


पुरं आईष्य सरलं

नाय उरला छ्दामं

कष्ट करता करता

गेला बुडईत घाम..


केसं पिकंले रे सारे

नाय पिकलं रे शेतं

यवो कोणतं बी सरकारं

त्याची खोटीच नियत..


रोज पेठं सजते

नेसून दिवाईचा शालू

एका साळीत आईष्य सरलं

मायी भाबळी गां मालू..


पोट्ट भोंगयं रस्त्यानं

रडे भातंक्यासाठी

कुठून देऊ म्या पयसा

माहा धोतराले गाठी..


लेकं देखाले देखणी

माही तरणी पोरगी

बाणा फाटका नेसते

तिची चप्पलं बोळखी..


आला लगनाले शिरु

त्याले पोरगी भेटना

भरं जवानी चालली

गेली मरुन वासना..


अवंदा नायं आलं पाणी

भेटला नाई गां भावं

कर्ज कुठून भरू मी

आंगी नाई रायला ताव..


लग्न कसं मी गां करू

देवू कोणाची गां हमी

फासं गयाले लागला

कोणी येई ना गां कामी..


माहा शेतकरी सर्जा

उन्हातानात राबतो

त्याच्या रक्ताच्या थेंबाचा

भाव पाण्यात मोजतो...


किती मरावं त्यानं

त्याच मरणही खोटं

चूलं ज्यामुळे पेटते

त्याच उपाशीचं पोटं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational