STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

शेकोटी...!

शेकोटी...!

1 min
2.1K


शेकोटी....!!!!


पहाट पारी थंडीची स्वारी

अंगाखांद्यावर झोंबु लागली

अंगात हुडहुडी माझ्या

चांगलीच भरू लागली


घरात दारात जाईल तिथे

या बयेने ठाण मांडलेले

जिथे तिथे हिचे

साम्राज्य सांडलेले


कोपऱ्यावर एक बंडखोर

शेकोटी नुकतीच पेटलेली

धुरकांड्या विना

धूर सोडत कडेकडेने भडकलेली


पाय माझे नालायक

तिकडेच लायक होण्यासाठी वळले

तेंव्हा मात्र मला

शेकोटीचे मोल कळले


काठी फिरवून तिला

चेतवणे अधून मधून चालले होते

पाला पाचोळा भक्ष्यस्थानी

सरकवणे भाग पडत होते


ज्वाला कडेनेच भडकल्या

हवी हवीशी ऊब देऊ लागल्या

थंडीत सुद्धा मला त्या

खरेच त्या मला आपल्या वाटल्या


शेकोटी ची मजा काही और असते

ती भोगेल त्यालाच ती कळते

थंडीत गड्या शेकोटिच

खरी माय असते,खरी माय असते....!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational