शब्द तुझे खुलू दे
शब्द तुझे खुलू दे
काय सांगू सख्या तुला;
कशी जगते,कशी राहते,
माझ्या आयुष्यात अशी
दिनरात तुलाच पाहते.
मोजले आतावरी जे
श्वास होते कोरडे,
टीपू लागे प्रेम स्वप्न;
जे उराशी बाळगते
घेऊ नको वैर कुणासी
शपथ आहे तुला माझी;
जपुन घे सर्व नाती;
मलाही जप समज तुझी .
काय झाले रे मनाला;
काहीही कळतच नाही;
शहरी सारा दंगा फसाद;
मनात तसाच कल्लोळही.
थांब घाई नको करु;
हा प्रहर जरा ढळू दे;
मी न बोलताही कधी;
तुझे शब्द शब्द खुलू दे.

