शब्द माझे
शब्द माझे
शब्दांना भावार्थ न येता
ओढ़ कवितेची हरली
एकांती ही जीवनगाथा
मनी शब्दावली सरली
शोधतो अंतरमनात मी
हरवलेले शब्द सारे
वाहतील परत एकदा ते
शब्दांचे थंडगार वारे
दुरावून बसले जरी का
शब्द ते भाव मांडणारे
येतील परतुन जीवनी
नऊरस प्रेमगीत गाणारे
विश्वास नशिबाचा नाही
शब्दांचीच हमी आहे
एकट्या जीवनी माझ्या
शब्दांचीच साथ आहे