शाश्वत
शाश्वत
क्षणभंगुर जगामधी
माल असली नकली
हवी पारख सजग
वाटे नकली असली
चकाकते ते सोने नसते
शाश्वत नियम जगाचा
तरी फसती भाबडे
अनुभव ना जगाचा
अध्यात्मही शुद्ध नसे
शिरकाव भेसळीचा
बुवाबाजी भोंदू साधू
शाश्वताचा शोध घ्यावा
कर्मामधे रहा दंग
कर्म श्रेष्ठ दुनियेत
पूजापाठ जपजाप्य
नको दानधर्म येथ
पुसा अश्रू दुःखितांचे
खाऊ घाला गरीबांना
समाधान लाभे मना
पूर्ण हो मनोकामना
शोध शाश्वताचा थांबे
इथे सारी तीर्थस्थळे
प्रसन्न देवदेवता
सार्थकता इथे मिळे
