STORYMIRROR

Pratibha Vibhute

Children

4  

Pratibha Vibhute

Children

शाळा भरली

शाळा भरली

1 min
480

शाळा असे विद्या मंदिर

बालपणात मिळे ज्ञान

जीवनाला दिशा देऊन

जगतात होतो बहुमान...१!


रोगराईचा भस्मासूर तो

गिळंकृत करी मानवाला

भीतीदायक वातावरण 

सुट्टी पडली या शाळेला...२!


संपली आता दहशत

सुरू झाल्या शाळा सर्व

आनंदली चिमणी पाखरं

सुरू नवे जीवनाचे पर्व...३!


किती दिवसांनी भेटले

माझे गुरूजी नी सारे मित्र 

आनंदाला सर्वांच्या उधाण

शाळेचे होते वेगळेच चित्र..४!


नवीन अभ्यास, नियम

करू आपण आत्मसात

संकटाचे पाढे विसरून 

देऊ मदतीचा हाती हात...५!


सुरू झाले ज्ञान मंदिर

मानू ईश्वराचे सारे ऋण

उत्साहाने करू अभ्यास

न दवडता एकही क्षण...६!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children