सदाफुली
सदाफुली
बारमाही बहरणारी
कुठेही रुजणारी कुठे फुलणारी
पाच नाजूक पाकळ्यांसह लांबट हिरव्यागार पानावर
गुलबक्षी रंगात खुलून दिसणारी
जगण्यासाठी झगडणारी
झगडून उमलणारी
दिमाखात डोलणारी
वाऱ्यावर झुलणारी
अंत स्वतःचा माहित
असून देखील
भेटणाऱ्या प्रत्येकाला आनंदित करणारी
वाटत आयुष्य ही अस असावं
सुख दुःखात सदैव आपण सदाफुलीसारखं बहरावं
न डगमगता न घाबरता
सूर निराशेचा न लावता मिळेल त्यात समाधानी असावं..
