सैनिक
सैनिक
आम्ही सैनिक वाचवू भारताचा ध्वज
उतरवू माज
दुश्मनांचा...
सोसला नेमाने
ऊन, पाऊस, वारा
अखंड नारा
राष्ट्रभक्तीचा...
जर आमच्यावर
शत्रूने करता चाल
करतो हलाल
मारेकऱ्याला...
सदैव पहारा
सियाचीन आमचे घर
बर्फाची चादर
पांढरीशुभ्र...
आई - बहिणी
घरी पाहतात वाट
दुःखाचा घाट
डोळ्यांतून...
नाही भाग्यात
पत्नीची हक्काची मिठी
वाचतो चिठ्ठी
जीवनसाथीची...
इवलीशी चिमुरडी
म्हणे मला बाबा
घेतला ताबा
काळजाचा...
माहिती नाही
सण आणि उत्सव
कुठलाच महोत्सव
सैनिकाला...
प्रत्येक दिवशी
सीमेवर करतो रक्षण
शत्रूचे भक्षण
सुरक्षेसाठी...
सैनिकाच्या नशिबी
बंदूक, रायफल, रणगाडा
दुश्मनांचा गराडा
मानगुटीला...
राष्ट्रहित साधूया
उंचावू भारताचा ध्वज
उतरवू माज
शत्रूचा...
सीमेवर सैनिक
अखंड पराक्रम गाजवितो
शूराला वंदितो
देशकल्याणार्थ...
मान - सन्मान
लाभे, मिळे परमवीरचक्र
ठरते शौर्यचक्र
जवानांसाठी...
करूनी प्रतिज्ञा
घेतले व्रत देशसेवेचे
रक्षण भारतमातेचे
विविधतेचे...
