Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sujit Falke

Abstract Inspirational Others

3  

Sujit Falke

Abstract Inspirational Others

सावित्रीची मी लेक

सावित्रीची मी लेक

1 min
779


शिक्षणाची अखंड क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन आणि माझी ही शब्द सुमनांजली.............


सावित्री माय थोर 

शिक्षणाची जननी

कृतार्थ होऊनी ठेविते

 माथा तव चरणी //धृ//


माय तुझी हि लेक 

होती अजान

तुझ्याच मायेने आज 

उभारलीय छान 

काय वर्णवु 

तुझी थोर महती//१//


चुल अन मुल हे

 होते माझे जग

तुझ्याच उभारणीने 

मी आज गाठते शिखर

नाही राहिले मी 

कुणाची बनून खेळणी//२//


मान अपमान किती

 जन्म सोसला 

तुझ्याच एका ठिणगीने

 आसमंत पेटला

स्त्री शक्तीचा जागर 

आता पडतोय अंगवळणी //३//


तु पहा मायी तुझ्या

 रोपट्याचे झाले वन

यशाची सर्व शिखरे

 घालती लोटांगण

तुझ्याच क्रांतीची 

हि नव मशाल पेटली //४//


राहुदे हात नेहमी

 आम्हावर

मिळूदे तुझ्या पंखाची 

उब जीवनभर

सावित्रीची लेक मी 

अशी ललकारी नभी घुमली //५//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract